मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा

Spread the love

धाराशिव : (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि, या कारखान्यात ५४ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचीत्य साधुन ६ मार्च रोजी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे टाईम किपर दिपक जाधव यांनी सर्व प्रथम उपस्थित कर्मचारी, कामगार यांना सुरक्षिततेची शपथ दिली. त्यानंतर सुरक्षा व इंजि. विभागातील कर्मचाºयांनी वापरण्यात येत असलेल्या सुरक्षिततेच्या साधनांचा प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे म्हणाले, आपली सुरक्षा हिच कुटूंबाची सुरक्षा यामुळे सर्व कामगार व अधिकारी यांनी कारखान्यात काम करीत असताना अपघात होवू नये याची दक्षता घेवून हेल्मेट, सेफ्टी बुट, सेफ्टी बुट यासह आवश्यक त्या सेफ्टी साधनाचा वापर करावा. कर्मचाºयांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुन विना अपघात काम केल्यास कामगारांची, कारखान्याची तसेच राष्ट्राची प्रगती होते. तसेच कामगारांनी दिलेल्या नियमावलीप्रमाणे व सुरक्षा साहित्याचा वापर केल्यास अपघात रोखण्यासाठी मदत होते असे प्रतिपादन केले. सुरक्षा सप्ताह कार्यक्रमासाठी सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री सिद्धिविनायक परिवारातील दोन्ही कारखान्यांच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात

    Spread the love

    Spread the loveशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य, पारदर्शक कारभारासह हंगाम 2024/25 चा अंतिम 200 रुपयांचा हफ्ता देण्याची घोषणा धाराशिव – श्री सिद्धिविनायक परिवारातील तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्रमांक…

    कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्कला मोठी गती : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील पहिल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी कौडगाव येथे महत्त्वपूर्ण आशा पायाभूत कामांचा सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. १६ कोटी ५४ लाख रुपये…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *