जिल्ह्यात २१ वी पशुगणना अंतिम टप्प्यातपशुपालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Spread the love

धाराशिव – २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पार पडत असून,धाराशिव जिल्ह्यातील ७५ टक्के पशुगणना पूर्ण झाली आहे. पशुपालकांनी आपल्या सर्व पशुधनाची अचूक माहिती प्रगणकांकडे नोंदवावी.असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पशुगणना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे.जिल्ह्यातील ८९८ गावे आणि शहरी प्रभागांपैकी ६७२ ठिकाणी (७५ टक्के) पशुगणना पूर्ण झाली आहे.उर्वरित २५ टक्के गणना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सूचना दिल्या आहेत.

पशुगणनेसाठी ११० प्रगणक आणि २४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.घरोघरी जाऊन गणना करणाऱ्या प्रगणकांना पशुपालक, शेतकरी आणि नागरिकांनी सहकार्य करावे,तसेच ज्या पशुपालकांनी आपले पशुधन किंवा शहरी भागातील पाळीव प्राणी नोंदवलेले नाहीत,त्यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

पशुगणना १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी धाराशिव,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पशुसंवर्धन विभागाचे उप आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *