धाराशिव शहरातील प्रभाग क्र. 18 मधील नागरिकांचे हाल – गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास

Spread the love

धाराशिव : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील दर्गा देवस्थान समोरील परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. येथील गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, स्वच्छतेच्या अभावामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

नियमित नाली सफाई व रस्ते स्वच्छता प्रशासनाने ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणे केली जात नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. आठ दिवसांतून एकदा नाली सफाई करणे बंधनकारक असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही केवळ आश्वासनांची उडवा उडवी होत आहे, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, उरूस (जत्रा) पार पडल्यानंतर दोन महिने उलटले तरी अद्याप गटारी स्वच्छ केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे डास, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता व्यवस्था सुधारावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *