नवी मुंबईतील एज्युसिटीला अमेरिकेतील केनेडीकट राज्य करणार मदत

Spread the love

केनेडीकट राज्याचे गव्हर्नरसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा

मुंबई -: नवी मुंबई परिसरामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ व दळणवळणाच्या दर्जेदार सुविधांमुळे तिसरी मुंबई विकसित होत आहे. सर्व सुविधा लक्षात घेता नवी मुंबईत नवीन ‘ एज्युसिटी ‘ निर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे . त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्य मदत करणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे आज कनेक्टिकट राज्याचे गव्हर्नर नेड लॅमांट व त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ‘ एज्यूसिटी’ उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे ‘ पॉवर हाऊस’सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुकीचे हब आहे. देशातील एकूण परकीय गुंतवणूकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यात देशाच्या ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आहे. राज्याला २०३० पर्यंत १ हजार अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यापैकी राज्याने सध्या निम्मे उद्दिष्ट साध्य केले आहे.

नवीन एज्युसिटीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच असणार आहे या विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सोयी सुविधांची कामे वेगाने सुरू आहे. मेट्रो, नवीन विमानतळ, आंतरराष्ट्रीय बंदर आदी पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यात येत आहे. यामुळे राज्य अधिक गतीने विकसित होत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शिष्टमंडळात गव्हर्नर समवेत केनेडीकट प्रांताचे एक्झिक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट कॅथी कान्गारेल्ला, केनेडीकट विद्यापीठाचे अध्यक्ष राडेन्का मॅरीक, याले विद्यापीठाचे व्हाईस प्रोवोव्ह फॉर रिसर्च ‘ मायकल क्रेअर, पेप्सिको कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *