“कनि महिला मंच यांचा हळदीकुंकू कार्यक्रम धाराशिव मध्ये उत्साहात संपन्न”

Spread the love

समृद्धी महिला गृह उद्योग धाराशिव व राज ज्वेलर्स धाराशिव यांच्या सहकार्याने साजरा झाला.

धाराशिव – कनि महिला मंच सौ. कल्याणी उल्हास कदम पुणे (संस्थापक अध्यक्ष)यांचे नेतृत्वाखालीगेल्या पाच वर्षापासून महिलांसाठी अविरतपणे काम करत आहे ,यामधून महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा बिजनेस वाढवता यावा यासाठी त्यांनी महिला मंचच्या वतीने गेली अनेक वर्ष महिलांना मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभा केले आहे.
याची सुरुवात पुणे ,सोलापूर , या संपूर्ण जिल्ह्य़ात झाली असून आता ते धाराशिव मध्ये आले आहे .धाराशिव येथील समृद्धी गृह उद्योग एमआयडीसी धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कनि महिला मंच यांनी प्रबोधन केले.
समृद्धी गृह उद्योग यांनी घेतलेली उत्तुंग भरारी महिलांना सांगितली. त्याचबरोबर त्यांना कनि मंचच्या सभासद करण्यात आल्या. महिलांसाठी खास स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतून सोन्याची नथ व इतर आकर्षक बक्षीस देण्यात आली .समृद्धी महिला उद्योग यांच्या गिफ्ट सुद्धा याप्रसंगी देण्यात आल्या. अनेक महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता हा कार्यक्रम आई lawns धाराशिव या ठिकाणी साकार झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर विशाल सूर्यवंशी यांनी केली तर महिलांचे गेम अनुजा पानसरे यांनी घेतल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समृद्धी महिला गृह उद्योग यांनी परिश्रम घेतले.कनि महिला मंच ची सुरुवात सौ.कल्याणी उल्हास कदम यांनी पुण्यापासून केली आहे. आज त्याच्या जवळपास दहा ते पंधरा हजार सभासद आहेत व त्याची मूर्तमेढ शितल इंदापूरकर यांनी धाराशिव मध्ये लावली.,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रेमाताई सुधीर पाटील , माधुरी जगदाळे मॅडम, शितल इंदापूरकर ताई, रोहिणी अडसुळ ताई ,शबाना मॅडम उपस्थित होत्या. या स्पर्धेची सोन्याच्या नथची मानकरी ठरली भाग्यश्री लाड, ही सोन्याची नथ राज ज्वेलर्स यांनी दिली होती.तर उपविजेत्या ठरल्या शुभांगी तीर्थकर व भाग्यश्री भोईटे यांचे गिफ्ट देऊन अभिनंदन केले…..या कार्यक्रमात सोन्याच्या नथ ची मानकरी ठरली भाग्यश्री लाड,, तिच्या शिरपेचात घालून तिला सोन्याची नथ बक्षीस देण्यात आली.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *