शेतकऱ्यांनी योजनांच्या सुलभ लाभासाठी,ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करा,जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांचे आवाहन

Spread the love

  • मोफत ओळख क्रमांक तयार करून मिळणार
  • शेतकऱ्यांनी सेतू केंद्राशी संपर्क करावा
  • टाळाटाळ करणाऱ्या केंद्र चालकांवर होणार कारवाई

धाराशिव – शेतकऱ्यांना अधिक समृध्द आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच , हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच अॅग्रीस्टॅक ह्या संकल्पनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु झाली आहे.या योजनेव्दारे शेतकऱ्यांना ओळख ( फार्मर आयडी ) दिला जाणार आहे.

ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ,अचूक हवामान अंदाज,मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळणार आहे. तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेणे सोपे होणार आहे.पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच डिजिटल पीक कर्ज मिळवणेही सोपे होणार आहे.

जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या दूरदृष्टी योजनेचा फायदा घेवुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ” शेतकरी ओळख क्रमांक ( Farmer ID ) ” तयार करुन घ्यावेत.असे आवाहन जिल्हा धिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

सर्व गावांमध्ये यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्राम महसुल अधिकारी,कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी यांचेशी किंवा नजीकच्या नागरी सेवा केंद्राशी ( CSC ) संपर्क साधुन मोफत ” शेतकरी ओळख क्रमांक ( Farmer ID ) ” तयार करुन घ्यावा.या कामाकरीता नागरी सेवा ( CSC ) केंद्र चालकास शासनाकडून मानधन देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांकडून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही.

जर कामकाज करत असताना नागरी सेवा ( CSC ) केंद्र चालक टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा करत असल्यास त्याबाबतची तक्रार संबंधीत तहसीलदार यांचेकडे करावी.केंद्र चालक दोषी आढळल्यास संबधीत नागरी सेवा ( CSC ) केंद्र चालकाविरुध्द कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी कळविले आहे.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *