माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय ? – वैभवी देशमुख

Spread the love

बीड – माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय ? – वैभवी देशमुख

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 35 दिवस उलटून गेल्यानंतर देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात प्रचंड आक्रमकता आहे . संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं आहे . गावातील महिला आंदोलकांनी संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयीत असल्याने टाकीवर चढत आक्रोश व्यक्त केलाय. गावकरी महिलांनी बीड एसपीच्या अंगावर बांगड्या फेकत आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने प्रशासनाला संतप्त सवाल केलाय . माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं .आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार ? प्रशासन नक्की करतंय काय ? आज माझे पप्पा गेले . काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं .आज जसा काका वर गेलाय, आरोपींना अटक झाली नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब टाकीवर जाईल .आमचा एक माणूस गेलाय तर प्रशासन आरोपींना पकडत नाही . ज्यावेळी कुटुंबातील सगळे जातील तेव्हाच हे आरोपींना पकडतील का? अशी आक्रमक भूमिका संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने घेतली आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *