अजितदादांच्या इशाऱ्यानंतर सीपी पोलीस आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर-सहा सहायक पोलीस आयुक्तांना दिले महत्वाचे विभाग

Spread the love

अजितदादांच्या इशाऱ्यानंतर सीपी अॅक्शन मोडवर-सहा सहायक पोलीस आयुक्तांना दिले महत्वाचे विभाग

पुणे – शहरातील वाढती गुन्हेगारी आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलीस दलात मोठे बदल करत आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशानंतर आयुक्तांनी आता नॉयलोन मांजा विक्र्त्यांवरही कारवाई सुरु केली आहे. शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती नेमणुक करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

अनुजा अजित देशमाने ACP Anuja Deshmane (खडकी विभाग) ते फरासखाना विभाग

विठ्ठल दिगंबर दबडे ACP Vitthal Dabade (विशेष शाखा, १) ते खडकी विभाग
अनुराधा विठ्ठल उदमले ACP Anuradha Udmale (विशेष शाखा २) ते हडपसर विभाग

नुतन विश्वनाथ पवार ACP Nutan Pawar (फरासखाना विभाग) ते विशेष शाखा २
अतुलकुमार यशवंत नवगिरे ACP Atulkumar Navgire (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा १

अश्विनी गणेश राख ACP Ashwini Rakh (हडपसर विभाग) ते वाहतूक शाखा

याबरोबरच १० सहायक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक यांच्या त्यांच्या विनंतीनुसार अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *