भ्रष्टाचार निर्मूलन समिती आयोजित शिबीरात बार्शी पोलिसांना मिळाले संमोहनाचे धडे

Spread the love

बार्शी : दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या मानसिक ताण तणावाशी पोलिसांना नेहमीच सामना करावा लागतो. हा मानसिक ताण कमी करण्यासाठी मन एकाग्र करुन स्वयंसूचना कशा घ्याव्यात आणि मानसिक ताण कसा कमी करावा याविषयीचे प्रशिक्षण देण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नवनियुक्त सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय अंबादास थोरात ( कोरे) यांच्या संकल्पनेतून सोलापूर येथील संमोहन तज्ञ रविंद्र सोरटे यांच्या स्वसंमोहन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या आरतीने झाली तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाध्यक्ष विजय अंबादास थोरात (कोरे) यांचा सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते करण्यात आला तर नव्याने बार्शी तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या संगीता पवार यांचा सन्मान बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी स.पो.नि.दिलीप ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला .तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हा पीआरओ प्राध्यापक आणि मुंडे सर यांचा सत्कार बालाजी मुंडे यांच्याकडून करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब गव्हाणे यांनी केले

बार्शी शहर पोलिस ठाणे येथे आयोजित केलेल्या शिबीरामध्ये सोरटे यांनी स्वयंसूचना घेऊन तणाव कमी करण्याचे तंत्र प्रात्यक्षिकासह शिकविले. या शिबीरात उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, बार्शी शहर पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे, तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप ढेरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ‘जनसंवाद’ च्या माध्यमातून दिलेले हे प्रशिक्षण तणावमुक्तीसाठी उपयुक्त व फायदेशीर ठरेल असे मत सहभागी शिबीरार्थींनी व्यक्त केले.

याप्रसंगी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय कोरे, समितीचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी प्रा. अनिल मुंढे, बार्शी तालुका उपाध्यक्षा संगीता पवार आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *