व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

Spread the love

तुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

वाहनाच्या रांगा पंपापासून ते समाधान हॉटेल पर्यंत जात असून यामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

वाहनाच्या रांगा ह्या समाधान ढाब्या पर्यंत जात असून सोलापूर ते धुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीची वाहन जात असतात या रांगा तील वाहनांना अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

अपघात झाल्यानंतर कोणी मयत झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे व्यवस्थापन हे चुकीचं नियोजन करत असल्यामुळे वाहडाच्या रांगा लागत असून यामध्ये निष्पाप भाविकांचा बळी देखील जाऊ शकतो.

शासनाने घालून दिलेल्या नियमांची येथे पायमली होत असून जे गॅस भरणारे कर्मचारी आहेत त्यांना कुठलेही संरक्षण कवच ना किंवा सुरक्षितेची काळजी येथे घेतली जात नाही भविष्यात जर एखादा अपघात घडला तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते. शासनाने घालून दिलेले नियमाचे पालन होणे आवश्यक असताना देखील व्यवस्थापन मात्र या नियमाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहेत. याचा फटका वाहनधारकाला बसण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *