संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

Spread the love

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावात जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जल जीवन मिशन अंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचा उपयोग गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्याने ही विहीर स्वतःच्या शेतीसाठी वापरण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.

गुरुवारी, संतप्त महिलांनी उपविभागीय अभियंताच्या कार्यालयात धरणे दिले. अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर महिलांनी आपले आंदोलन थांबवले. मात्र, या घटनेने जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीतील त्रुटी, कंत्राटदार व अधिकाऱ्यांमधील संगनमत आणि गैरव्यवस्थापन उघड केले आहे. गावकऱ्यांनी या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *