शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे यशस्वी आयोजन करा

Spread the love

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात प्रत्येक विभागाने आपल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणारे बॅनर्स,फ्लेक्स,पॅम्प्लेट्स आदींसह स्वतंत्र स्टॉल उभारावेत,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी श्री.पुजार यांनी दिले.

विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवरील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी १ मार्च रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या अनुषंगाने पूर्वनियोजन बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.बैठकीस जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री आई तुळजाभवानी जिल्हा स्टेडिअम येथे विधी सेवा प्राधिकरणाकडून स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून कार्यक्रमाच्या प्रभावी समन्वयासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे,असेही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी स्पष्ट केले.याशिवाय रक्तदान शिबीर व कर्करोग तपासणीसाठी मोबाईल मेडिकल व्हॅनची व्यवस्था,दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वितरण,कृषी विभागामार्फत विविध अवजारांचे वाटप,समाज कल्याण विभागातील लाभार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विविध विभागांच्या ऑनलाईन योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कडवकर यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना शिबीराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी, कळंब; उपविभागीय अधिकारी, भूम; उपविभागीय अधिकारी,उमरगा;तहसिलदार, उमरगा;प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग,सोलापूर;तसेच गटविकास अधिकारी, लोहारा आदी अधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *