आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात मांस-मटण विक्रीवर १५ दिवस बंदी; प्रशासनाचे कडक आदेश

Spread the love

पंढरपूर – : आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात १५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थांच्या विक्रीस मनाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी याबाबत बंदी आदेश जारी केले आहेत.

यंदाचा आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै रोजी होत असून, यात्रा कालावधी १५ ते २९ जुलै असा आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत. या काळात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

करकंबसह पाच गावांतही मांस-मटण विक्रीला मनाई

आषाढी यात्रेदरम्यान राज्यातील विविध मानाच्या व महत्त्वाच्या पालख्या करकंब येथे मुक्कामी असतात. लाखो भाविक करकंबसह परिसरातील गावांमध्ये वास्तव्यास असतात. विविध सामाजिक, राजकीय संघटना आणि भाविकांकडून मांस-मटण विक्रीवर बंदीची मागणी करण्यात आली होती.

त्या पार्श्वभूमीवर करकंब, पांढरेवाडी, व्होळे, देवडे आणि खेडभोसे येथे २० ते २५ जुलै २०२६ या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थांच्या विक्रीस मनाई करण्यात आली आहे.

  • Related Posts

    सामंजस्य करार ते प्रत्यक्ष गुंतवणूक,उद्योग आणि रोजगार’ हा विकासाचा मार्ग असावा,पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव उद्योग – गुंतवणुकीसाठी सज्ज ; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा गुंतवणूक परिषदेचे पालकमंत्र्यांनी केले ऑनलाइन उद्घाटन धाराशिव – जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्हा उद्योग,गुंतवणूक…

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *