इजमा (IJMA) संघटनेची बैठक धाराशिव येथे संपन्न.

Spread the love

धाराशिव  (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील गुळ पावडर उत्पादक कारखान्यांची संघटना इनोव्हेटिव्ह जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IJMA) यांची मासिक बैठक धाराशिव येथील अँपल हॉटेल येथे यशस्वीपणे पार पडली.

या बैठकीत चालू ऊस गाळप हंगामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गुळ पावडर उत्पादक कारखान्यांच्या गाळपाची सद्यस्थिती, उपलब्ध ऊस, उत्पादन खर्च तसेच बाजारातील मागणी-पुरवठा यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच येत्या काळातील ऊस गाळपाचे नियोजन, गुळ पावडर विक्रीसाठी किमान व योग्य दर, आर्थिक शिस्त, बाजारातील स्पर्धा, वाहतूक व साठवणूक व्यवस्थापन, कामगार सुरक्षितता आदी विषयांवर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस इजमाचे कार्यकारी अध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील, श्री सिद्धीविनायक समूहाचे संस्थापक तथा सचिव दत्ता कुलकर्णी,उपाध्यक्ष तथा डी.डी.एन. समुहाचे चेअरमन विजय नाडे, कोषाध्यक्ष तथा एस.एम.डी. समूहाचे चेअरमन हणुमंत मडके, तज्ज्ञ संचालक प्रविण प्रजापती, कुलस्वामिनीचे संस्थापक मधुकर तावडे, चेअरमन आकाश तावडे, तुळजाभवानी शुगरचे चेअरमन अनिल काळे, हणुमान खांडसरीचे चेअरमन रामनिवास अग्रवाल, रुपामाता पॉवरचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड-पाटील, दत्तकृपा चे चेअरमन शरद पाटील, निमजाई चे चेअरमन मकरंदराजे राजेनिंबाळकर, साईप्रसाद शुगरचे चेअरमन बबनराव गवते, गुलमेश्वर शुगरचे व्हाईस-चेअरमन सिद्धेश्वर वायकर, बळीराजा अ‍ॅग्रोचे चेअरमन एकनाथ चाळक, शिवाजीराव अ‍ॅग्रोचे चेअरमन रविंद्र काळे, आशापुरक अ‍ॅग्रोचे संचालक वरद चरखा, गोपाळबुवा शुगरचे संचालक राजेश कराड, युके फार्म्सचे चेअरमन ओंकार खुर्पे, सोनाई अँग्रोचे चेअरमन प्रा. टी. पी. मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी चालू ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व सभासदांनी परस्पर सहकार्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • Related Posts

    धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त  तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे…

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा सलग चार वर्षे अव्वल

    Spread the love

    Spread the love६२२ महिला उद्योजिकांची ऐतिहासिक भरारी धाराशिव दि.१५ एप्रिल (जिमाका) कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास हा केवळ शेतीवर आधारित नसून,त्या भागातील युवक-युवतींना मिळणाऱ्या उद्योग व रोजगार संधींवर अवलंबून असतो.हेच सूत्र…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *