अधिकारमित्र’ पदासाठी अर्जास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Spread the love

निस्वार्थ समाजसेवेची इच्छुकांसाठी सुवर्णसंधी — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत ‘अधिकारमित्र’ पदाकरिता काम करण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.यासाठी पूर्वीची अंतिम तारीख दि.६ जानेवारी २०२६ होती. आता सदर पदासाठी अर्ज सादर करण्यास दि.१७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

धाराशिव तालुका कार्यक्षेत्रातील अर्जदारांनी आपले अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद येथे सादर करावेत.तर उमरगा,भूम, परंडा,तुळजापूर,कळंब,वाशी व लोहारा या तालुका कार्यक्षेत्रातील अर्जदारांनी आपले अर्ज संबंधित तालुका विधी सेवा समितीच्या न्यायालय परिसरातील कार्यालयात दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावेत.विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत,याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्यासंबंधी पात्रता,अटी, नियम व इतर तपशीलांची जाहीर सूचना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद तसेच सर्व तालुका विधी सेवा समिती,पंचायत समिती,तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

ज्यांना निस्वार्थ समाजसेवा तसेच शासकीय योजनांची जनजागृती करण्याची इच्छा आहे व जे विहित पात्रता धारण करतात,अशांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.निवड झालेल्या अधिकारमित्रांना कार्यालयीन कार्यक्रम व उपक्रमांसाठी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत किंवा क्षेत्रीय स्तरावर कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.यासाठी प्रतिदिन ७५० रूपये मानधन देण्यात येणार आहे.

तरी या संधीचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा व १७ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद व संबंधित तालुका विधी सेवा समिती येथे अर्ज सादर करावेत,असे आवाहन श्रीमती. अभिश्री देव,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि श्रीमती भाग्यश्री पाटील,सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर),उस्मानाबाद यांनी केले आहे.

  • Related Posts

    धाराशिव येथे २२ मे रोजी भव्य रोजगार मेळावा ; १७ नामांकित आस्थापनांकडून २८९ पदांसाठी भरती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व महिला उमेदवारांसाठी शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता…

    विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveपुणे – सैनिक कल्याण विभाग पुणे येथे  करार पद्धतीने कंत्राटी अशासकीय स्वरुपात विधी सल्लागार पॅनलची नेमणूक करण्यात येणार असून त्याकरिता २२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज व सिलबंद दरपत्रके…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *