धाराशिव येथे २२ मे रोजी भव्य रोजगार मेळावा ; १७ नामांकित आस्थापनांकडून २८९ पदांसाठी भरती

Spread the love

धाराशिव – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व महिला उमेदवारांसाठी शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात १७ नामांकित आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी होऊन तब्बल २८९ रिक्त पदांसाठी थेट निवड प्रक्रिया राबविणार आहेत.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (आर.पी. कॉलेज),धाराशिव येथे होणाऱ्या या रोजगार मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.एसएससी, एचएससी,आयटीआय,डिप्लोमा, पदवीधर,बी.कॉम,एम.कॉम, बी.एस्सी,एम.एस्सी,जीएनएम, एएनएम,बीएससी नर्सिंग,एमबीए आदी पात्रताधारक युवक-युवतींना विविध पदांसाठी मुलाखती देता येणार आहेत.

मेळाव्यात पुणे येथील Quess Corp Ltd मार्फत NAPS/NATS/Apprentice पदांसाठी १०० जागांची भरती केली जाणार आहे.तसेच बार्शी येथील Darshna Solvent Extraction Pvt. Ltd.मध्ये Supervisor, Operator,Office Boy, Watchmen आणि Helper पदांसाठी २० जागा उपलब्ध आहेत. उमरगा येथील SHK Chemtech Pvt. Industry मध्ये Assistant आणि Helper पदांसाठी १० जागांची भरती होणार आहे.

धाराशिव येथील Pavanraje Loksamrudhi Multistate Co. Credit Society Ltd.मध्ये Branch Manager पदासाठी ५,तर Clerk, Cashier आणि Peon पदांसाठी १९ जागा उपलब्ध आहेत.तामलवाडी येथील Balaji Amines मध्ये Field Operator, Chemist,Assistant आणि Helper पदांसाठी २१ जागांची भरती होणार आहे.Padmaja Tractor, धाराशिव येथे Watchman आणि Operator पदांसाठी १२ जागा उपलब्ध आहेत.

आरोग्य क्षेत्रातील उमेदवारांसाठीही मोठी संधी उपलब्ध असून Sahyadri Multispeciality Hospital मध्ये Nurse पदासाठी १०,Receptionist पदासाठी ४ आणि Ward Aaya/Ward Boy पदासाठी १० जागा भरल्या जाणार आहेत.Suvidha Hospital & ICU Center येथे Staff Nurse पदासाठी ६ जागा,Niramay Hospital मध्ये Ward Boy पदासाठी २ जागा,तर Kranti Hospital मध्ये Staff Nurse पदासाठी ६ जागांची भरती केली जाणार आहे.

याशिवाय कृषी,वाहन,विमा, अकाउंट्स आणि सेवा क्षेत्रातील विविध पदांसाठीही संधी उपलब्ध आहेत.Kulswamini Multistate Agro Allied Purpose Co-Op Society Ltd.मध्ये Sales Officer आणि Accountant पदांसाठी ४ जागा, Anuradha Tractors मध्ये Technician,Salesman,Office Boy आणि Helper पदांसाठी १० जागा,Ashok Leyland Showroom मध्ये Technician पदासाठी २ जागा उपलब्ध आहेत. SBI Life Insurance मध्ये Financial Adviser पदासाठी २० जागा, Sureta Arts,परंडा येथे Graphic Designer,Telecaller आणि Field Staff पदांसाठी ६ जागा,Om Siddh Organics मध्ये Accountant, Store Keeper, HR आणि Admin Executive पदांसाठी ४ जागा,तर Marathwada Agro Process Farmer Producer Company Ltd.,कळंब येथे Sales & Dispatch Officer आणि Office Executive पदांसाठी १३ जागांची भरती होणार आहे.

सर्व पदांसाठी वयोमर्यादा साधारणपणे १८ ते ४५ वर्षांदरम्यान असून,पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.वेतन व इतर सुविधा या संबंधित आस्थापनांच्या नियमानुसार राहणार असून त्याबाबतची माहिती मुलाखतीदरम्यान दिली जाणार आहे.उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे,अनुभव प्रमाणपत्रे, बायोडाटा आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिकाधिक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा कार्यालयाच्या ०२४७२-२९९४३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा

  • Related Posts

    अधिकारमित्र’ पदासाठी अर्जास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Spread the love

    Spread the loveनिस्वार्थ समाजसेवेची इच्छुकांसाठी सुवर्णसंधी — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत ‘अधिकारमित्र’ पदाकरिता काम करण्यास इच्छुक…

    विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveपुणे – सैनिक कल्याण विभाग पुणे येथे  करार पद्धतीने कंत्राटी अशासकीय स्वरुपात विधी सल्लागार पॅनलची नेमणूक करण्यात येणार असून त्याकरिता २२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज व सिलबंद दरपत्रके…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *