विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Spread the love

पुणे – सैनिक कल्याण विभाग पुणे येथे  करार पद्धतीने कंत्राटी अशासकीय स्वरुपात विधी सल्लागार पॅनलची नेमणूक करण्यात येणार असून त्याकरिता २२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज व सिलबंद दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त) यांनी केले आहे.

सैनिक कल्याण विभाग, पुणे तसेच सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबीतांची विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच आर्म्ड फोर्सेस ट्रॅब्यूनल खंडपीठ मुंबई, औद्योगिक, कामगार न्यायालय, जिल्हा सत्र, दिवाणी व इतर न्यायालयांमध्ये असतात. या प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी या पदाच्या नेमणुकीसाठी विधी सल्लागार पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी कर्मचारी, अधिकारी अथवा विधीची पदव्युत्तर पदवी धारण केलेली आणि प्रत्यक्ष वकिलीचा १० वर्षाचा अनुभव व पात्रता आवश्यक राहील. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संचालक, सैनिक कल्याण विभाग, रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१ अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६३०२६०३ वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

  • Related Posts

    धाराशिव येथे २२ मे रोजी भव्य रोजगार मेळावा ; १७ नामांकित आस्थापनांकडून २८९ पदांसाठी भरती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व महिला उमेदवारांसाठी शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता…

    अधिकारमित्र’ पदासाठी अर्जास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Spread the love

    Spread the loveनिस्वार्थ समाजसेवेची इच्छुकांसाठी सुवर्णसंधी — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत ‘अधिकारमित्र’ पदाकरिता काम करण्यास इच्छुक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *