आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्नजिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि एन.ए.बी. संचलित निवासी अंध कार्यशाळेचा उपक्रम

Spread the love

सोलापूर :- आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व एन.ए.बी. संचलित निवासी अंध कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात मार्गदर्शन करताना लोकभीरक्षक देवयानी किणगी यांनी दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 अंतर्गत शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, आरक्षण व सन्मानाने जगण्याचा दिव्यांगांना असलेला कायदेशीर हक्क स्पष्ट करून सांगितला. शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये व सार्वजनिक ठिकाणी सुगमतेच्या सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. दिव्यांगांवर होणारा भेदभाव, छळ वा हक्कांपासून वंचित ठेवण्याचे प्रकार हे शिक्षापात्र गुन्हे असल्याची माहितीही देण्यात आली.

लोकभीरक्षक शिवकैलास झुरळे यांनी दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, प्रवास सवलती, शैक्षणिक व रोजगारावरील विशेष सवलती याबाबत सविस्तर माहिती दिली.

शिबिरात उपस्थित दिव्यांग प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडले. प्रश्नोत्तर सत्रात कायदेविषयक तज्ञ देवयानी किणगी, शिवकैलास झूरळे व अनुराधा कदम यांनी संबंधित प्रश्नांना योग्य कायदेशीर उपाय सुचवले. तसेच गरजू दिव्यांगांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेशीर मदत उपलब्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास व्यासपीठावर अंकुश कदम, रामचंद्र कुलकर्णी, देवयानी किणगी, अनुराधा कदम, शिवकैलास झूरळे व स्वप्नील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विधिज्ञा अनुराधा कदम, स्वप्नील मोरे तसेच प्रशिक्षणार्थी दिव्यांगांनी मनोगत व्यक्त केले.

या उपक्रमातून दिव्यांग व्यक्तींमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढून त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण झाली, असा विश्वास एन.ए.बी. संचलित निवासी अंध कार्यशाळेचे प्रमुख रामचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. मनोज शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी प्राधिकरणाचे कर्मचारी तसेच एन.ए.बी. निवासी अंध कार्यशाळेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले, अशी माहिती अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. ए. जी. नदाफ यांनी दिली.

  • Related Posts

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    धाराशिव जिल्हयातील महिलांनी आर्थिक,सामाजिक व राजकीय दृष्टया सक्षम व्हावे किर्ती किरण पुजार,जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धाराशिव व महिला व बाल विकास विभाग जि.प.धाराशिव व महिला आर्थिक विकास महामंडळ धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *