दारू नको, दूध प्या – तरुणांसाठी सकारात्मक संदेश, संभाजी ब्रिगेडचा आगळावेगळा उपक्रम

Spread the love

बार्शी : 31 डिसेंबर रोजी दारू पिण्याची फॅशन झपाट्याने वाढत चालली असून, यामुळे तरुणांचे आयुष्य आणि कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून संभाजी ब्रिगेड मागील तीन वर्षांपासून एक आगळावेगळा उपक्रम राबवत आहे. आनंद काशीद यांच्या संकल्पनेतून 31 डिसेंबरला दारूच्या ऐवजी मोफत दुधाचे वाटप करून तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचा संदेश दिला जातो.

31 डिसेंबर 2024 ला बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयासमोर सायंकाळी 6 वाजता या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन परिक्षेत्रीय विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते झाले, तसेच बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात श्री नालकुल यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी असे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. भविष्यात अशा उपक्रमांमध्ये आम्हीही सहभागी होऊ.” पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनीही हा उपक्रम समाज आणि देशहितासाठी असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष बालाजी डोईफोडे, विक्रम बापू घाईतिडक, रवींद्र मुठाळ, शोएब भाई सय्यद, इंजिनिअर विनोद कुमार मिसाळ, दिगंबर रणखांब, सचिन शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

“दारू नको, दूध प्या” या घोषणांनी श्री शिवाजी महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला, आणि तरुणांनी या सकारात्मक बदलाला उत्तम प्रतिसाद दिला.

संभाजी ब्रिगेडच्या या उपक्रमाने व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे अनेक तरुणांचे जीवन बदलण्यास मदत होईल.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *