अतिवृष्टीचा इशारा ;  जिल्ह्यात आज शनिवारी शाळांना सुट्टी

Spread the love

धाराशिव – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात आज २७ सप्टेंबर २०२५ रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान खात्याने सूचित केल्याप्रमाणे,जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून,जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.ही सुट्टी अंगणवाडी,पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक तसेच सर्व महाविद्यालये (सरकारी,खाजगी व आश्रमशाळा) यांना लागू राहणार आहे.

जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी पालक,शाळा व्यवस्थापन तसेच महाविद्यालयांना आवाहन केले आहे की,विद्यार्थ्यांची सुरक्षितता प्राधान्याने पाहावी आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक हालचाल टाळावी.
                 

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *