राज्यभरातील संरक्षण अधिकार्यांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम

Spread the love

राज्य महिला आयोगाचा उपक्रम

मुंबई दि. ८ सप्टेंबर – महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात महिला सुरक्षेसाठी कार्यरत असणारे संरक्षण अधिकारी यांचेसाठी दोन दिवसीय क्षमता बांधणी कार्यक्रम दि. ९ आणि १० सप्टेंबर २०२५ रोजी यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

या दोन दिवसीय शिबीराचे उद्घाटन आणि समारोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, यशदाचे डाँ मल्लिनाथ कलशेट्टी, महिला व बाल विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, यशदाचे उपमहासंचालक श्री मंगेश जोशी, महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेच्या उपायुक्त श्रीमती सुवर्णा पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. दोन दिवसीय शिबीरात राज्यभरातील १२० संरक्षण अधिकार्याना विविध विषयावंर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

· क्षमता बांधणी कार्यक्रमाची सुरुवात संरक्षण अधिकारी – जबाबदारी, अधिकार, भूमिका सत्राने मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत अॅड. राजेंद्र अनभुले करणार आहेत

· श्री हिंदुराव पवार, सहसंचालक कोषागार आणि लेखा हे कार्यालयीन कामकाज व शासकीय पत्रव्यवहार या विषयी मार्गदर्शन करतील.

· कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियमाविषयी डाँ अनघा सरपोतदार मार्गदर्शन करणार आहेत.

· बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वमान्य होत असताना, Al आणि प्रभावी AI टूल्सचा परिचय आणि नोटबुक LM विषयी श्री सुनिल पाटील संवाद साधतील.

· दुस-या दिवशी समुपदेशन – संवाद कौशल्य या विषयी अॅड. विजय देशमुख माजी सदस्य बालकल्याण समिती, तसेच माजी जिल्हा परिविक्षा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर आपले अनुभव सांगत मार्गदर्शन करणार आहेत.

· कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीतील आव्हाने याबाबत लेक लाडकी अभियानाच्या अडॅ. वर्षा देशपांडे आपले विचार मांडतील.

· कौटुंबिक न्यायालय, पुणे येथील वरिष्ठ विवाह समुपदेशक डाँ स्मिता जोशी या कौटुंबिक हिंसाचारात समुपदेशनाचे महत्व याविषयी संवाद साधतील.

· कौटुंबिक किंवा इतर त्रासाला सामो-या जाणा-या महिलांना त्यांच्यासाठी असलेले कायदें, मदतीची शासकीय यंत्रणा याची माहिती नसल्याने अनेकदा महिलांना अन्यायाविरोधात कोणाकडे दाद मागावी हे कळत नाही, त्यामुळे संरक्षण अधिका-यांनीच सोशल मिडीया, Al अशा माध्यमांव्दारे जनजागृती करत महिलांपर्यंत पोहोचावे यासाठीही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या, राज्यभरात महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेले समुपदेशक, संरक्षण अधिकारी, अंतर्गत तक्रार समितीचे सदस्य यांची क्षमता बांधणी करण्यासाठी राज्य महिला आयोग विशेष प्रयत्न करत आहे. कौटुंबिक छळाविरोधात न्याय मागण-या महिला यांचा पहिला संपर्क संरक्षण अधिका-यांशी होत असतो. राज्यभरात कार्यरत असणारे संरक्षण अधिकारी पिडीत महिलांना मदत करत, त्यांना न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. पिडीत महिलेस पोलीस यंत्रणांची मदत मिळवून देणे, न्यायालयीन कागदपत्र तयार करण्यास सहाय्य करणे, गरजेनुसार वैद्यकीय उपचार, समुपदेशन, तात्पुरता निवाराही उपलब्ध करुन देतात. न्यायालयाने दिलेल्या संरक्षण आदेशांची अंमलबजावणी ही त्यांच्यामार्फत होत असते. महिलांच्या पुनर्वसनात महत्त्वाची भूमिका बजावणार्या संरक्षण अधिका-यांना नवे कायदे, कायद्यातील सुधारणा, देशभरातील विविध न्यायालयातील महिला अनुषंगिक खटल्यांचे निकाल तसेच बदलत्या जीवनशैली सोबत महिलांचे बदलते प्रश्न, नातेसंबंधातील नवी आव्हाने याबाबत ही क्षमता बांधणी कार्यक्रमात तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि महिला यांच्यातील सामाजिक दुवा म्हणून काम करणा-या सर्व घटकांना अधिक सक्षम करण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील असल्याचे सांगत याआधी पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यात राज्यभरातील विविध जिल्ह्यात कार्यरत सखी वन स्टाँप सेंटर, भरोसा सेल मधील समुपदेशकांसाठी अशा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते असे त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    श्री गजानन महाराज पालखीचे तुळजापूर येथे आगमन; मा. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक केले स्वागत

    Spread the love

    Spread the loveश्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री गजानन महाराज पालखीचे आज श्रीक्षेत्र तुळजापूर येथे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी मा. जिल्हाधिकारी धाराशिव तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे…

    आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात मांस-मटण विक्रीवर १५ दिवस बंदी; प्रशासनाचे कडक आदेश

    Spread the love

    Spread the loveपंढरपूर – : आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात १५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थांच्या विक्रीस मनाई…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *