महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल

Spread the love

ऊर्जा राज्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली बैठक

धाराशिव – महावितरणमधील सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत तीन वर्षांचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील एचएसबीसी बिल्डिंग, फोर्ट येथे राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात विशेष बैठक पार पडली.

या बैठकीस धाराशिवचे आमदार कैलास (दादा) पाटील यांची विशेष उपस्थिती होती. महावितरणचे संचालक (मा.सं.) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक (प्रकल्प) औंढेकर तसेच मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीत आमदार कैलास पाटील यांनी इतर शासकीय विभागांप्रमाणेच महावितरण सहाय्यकांचा तीन वर्षांचा सेवाकाल नियमित सेवेत गणला जावा, या मागणीसाठी ठामपणे पाठपुरावा केला. यावर समिती नेमून ४५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ऊर्जा राज्यमंत्री महोदयानी महावितरण प्रशासनाला दिले.

कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी ओंकार केसकर यांनी शासन निर्णय, परिपत्रके व उपदान सेवानियमांचा दाखला देत सहाय्यक पदाचा सेवाकाल ग्राह्य धरण्याची मागणी मांडली. प्रशासनाच्या वतीने सकारात्मक निर्णयाचा शब्द देण्यात आला.

या बैठकीस निलेश भिरंगे, प्रदीप घुले,ज्ञानेश्वर राऊत,समाधान सानप व सोमनाथ टाळकुटे आदी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.

सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून ऊर्जा राज्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याची पुढाकार घेतल्याबद्दल आमदार कैलास (दादा) पाटील यांचे कर्मचारी वर्गातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

  • Related Posts

    राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

    Spread the love

    Spread the loveमुंबई : राज्य शासनाने आज मोठा प्रशासकीय फेरबदल करत १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांचाही समावेश…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वार्डाची सुरक्षा समिती सदस्यांकडून पाहणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे उष्माघात वार्ड पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आला आहे. रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *