आजचा दिवस शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

मुंबई, -: शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू गोविंद सिंगजी यांचे दोन पुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे फतेह सिंग यांच्या हौताम्यांची आठवण ठेवत प्रधानमंत्री नरेंद्र सिंग यांनी ठरविल्याप्रमाणे आजचा दिवस हा शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना नमन केले.

    वीर बाल दिवसाचे औचित्य साधून गोरेगाव येथील गुरुद्वारामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार विद्या ठाकूर, कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रभारी शक्ती सिंग, संयोजक किरण पाटील, सह संयोजक सुरींदर सिंग पुरी, सह संयोजक राणी द्विवेदी, गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मुख्यमंत्री म्हणाले की, हजारो पिढ्या आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत राहील आणि त्यांच्या हौतात्म्याची ही कहाणी आपल्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, ही आपली जबाबदारी आहे. या शहीद वीर बाल दिनानिमित्त या दोन साहेबजादे यांना आणि आदरणीय गुरु गोविंद सिंग जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या चरणी नतमस्तक होतो.

    यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आपल्या भाषणात गुरु गोविंद सिंगजी, त्यांचे दोन पुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे फतेह सिंग यांच्या शौर्य तसेच संपूर्ण कुटुंबाच्या त्यागाची माहिती वर्णित केली.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *