तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखडयामध्ये पुजारी व व्यापारी यांच्या सुचना ग्राहय धराव्यात ,खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Spread the love

दि. 28/04/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आई तुळजाभवानी मातेच्या मंदीर प्रस्तावित विकास आराखड्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. या बैठकीस माझ्यासह आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तसेच मंदिर परिसरातील पुजारी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते. आई भवानीच्या भक्तीने प्रेरित होऊन, तुळजापूरच्या परंपरांचा आदर राखत आणि भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करत खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले: मंदिराची पवित्र वास्तू व मूळ स्वरूप अखंड राखले जाईल. कोणताही अनावश्यक बदल न करता विकास आराखडा राबवला जाईल. पारंपरिक पूजा-पद्धती व कालाचार कायम राहतील. श्रद्धेचा गाभा अबाधित राहील. सेवेकऱ्यांची सेवा सुरक्षित ट्रस्टमार्फत मानधन तत्वावर सेवेची सलगता राखली जाईल. व्यापाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण! १९८८ मध्ये भूसंपादित रस्त्यावरील व्यापाऱ्यांना मावेजा तत्काळ दिला जाईल. व्यवस्थीत पुनर्वसन व सुविधा: विस्थापित व्यापाऱ्यांचे समर्पक पुनर्वसन सुनिश्चित करण्यात येईल. पुजारी व व्यापारी बांधवांचे हित सर्वोच्च: मूळ बाजारपेठ, व्यापारी व पुजारी यांचे विस्थापन टाळले जाईल. आई भवानीच्या मूळ मूर्तीचे महत्त्व जपले जाईल. १०८ फूट उंच भवानीमातेची भव्य मूर्ती: रामदरा तलाव परिसरात मूळ रचनेचा आदर राखून उभारण्यात येईल. भाविकांसाठी सुलभ दर्शनव्यवस्था: भक्तांचा सन्मान राखत सहज आणि समाधानकारक दर्शनासाठी प्रयत्न केले जातील. तुळजापूरची स्वच्छता व सौंदर्य वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येतील. आई भवानीच्या भक्तीचा गजर अखंड राहावा, परंपरा अभंग राहाव्यात आणि सर्व स्तरातील नागरिकांचे हित जपले जावे या ध्येयाने आम्ही कटिबद्ध आहोत! तुळजापूरचा विकास म्हणजे आपल्या श्रद्धेचा विजय आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *