उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – फड

Spread the love

धाराशिव  (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात उष्णतेची लाट वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.

नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे तसेच लिंबूपाणी, फळांचे रस, ताक यासारख्या थंड पेयांचे सेवन करावे. दुपारी १२ ते ३ या अत्यंत उष्णतेच्या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे. गरज असल्यास डोक्यावर टोपी, छत्री, टॉवेल किंवा इतर पारंपरिक साधनांचा वापर करूनच बाहेर पडावे. तसेच मसालेदार अन्न, अल्कोहोल, चहा, कॉफी आणि गोड पदार्थांचे सेवन टाळावे. तर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांची विशेष काळजी घ्यावी. अनवाणी बाहेर न जाण्याचेही नागरिकांनी भान ठेवावे असेही आवाहन फड यांनी केले आहे.

  • Related Posts

    शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveपुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे  – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण…

    सोलापूर रेल्वे विभागातील ३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांचा गौरव

    Spread the love

    Spread the loveसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर्स क्लब ऑडिटोरियम हॉल, सोलापूर येथे ७० वा रेल्वे आठवडा २०२५ कार्यक्रम आयोजित केला होता. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *