विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांच्या हस्ते ऑक्सीजन पार्क व वाचनालयाचे उद्घाटन

Spread the love

धाराशिव शहर पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त

धाराशिव – धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या दोन्हीचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर परिमंडळ विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, धाराशिव शहर पोलीस ठाण्यास आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले असून पोलीस निरीक्षक शकील शेख यांचा प्रमाणपत्र देऊन मिश्र यांच्या हस्ते दि.२७ मार्च रोजी गौरव करण्यात आला.
धाराशिव शहरातील नागरिकांना सेवा देण्यासह शहरात जातीय सलोखा कायम राखण्यासह कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी सतत पोलीस ठाण्याच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शहरात सर्व समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून सर्व धर्मीय सण साजरी करीत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. विशेष शहर पोलीस ठाण्यात स्वच्छतेबरोबरच येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर नागरिकांना पिण्याचे पाणी व आलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा सामोपचाराने निपटारा देखील वेळेवर केला जात आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या लौकिकामध्ये वाढ होऊन लोकोपयोगी पोलीस ठाणे अशी नवीन ओळख बनली आहे. जनतेला सेवा देण्याबरोबरच प्रशासकीय कामकाजामध्ये देखील पारदर्शकता आणून शहर पोलीस ठाणे कॉम्प्युटराईज्ड कामकाज करण्यामध्ये अग्रेसर झाले आहे. वरील सर्व सकारात्मक बाबींमुळे या पोलीस ठाण्यास आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांच्या हस्ते शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलीस निरीक्षक दिनेश जाधव, रवींद्र अंभोरे, संदीप ओव्हाळ, अक्षय दिघोळे यांच्यासह पोलीस अंमलदार चक्रधर पाटील, विरपक्ष वाघमारे, पोहेकॉ सुधीर मुंगळे, एस आर जाधवर, प्रवीण जमादार, मोबीन शेख, रिजवान बेग, गजानन कराळे, बापू पुरके आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *