यंत्रणांनी योग्य समन्वयातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार

Spread the love

धाराशिव – मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सात कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी शंभर दिवसात यंत्रणांना पूर्ण करावयाची आहे.जिल्ह्यातील विविध घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासोबतच विविध प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन करताना त्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घेऊन यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज १२ मार्च रोजी आयोजित विविध विभागाच्या आढावा सभेत श्री.पुजार बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,आत्म्याचे प्रकल्प संचालक खंडेराव सराफ,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री.आडे,प्रभारी कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड,जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.महामुनी व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.पुजार म्हणाले की,जिल्हास्तरीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत स्तरावर विविध योजना प्रकल्प व अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी थेट सरपंच व सचिवांशी समन्वय साधून संपर्कात राहावे.विशेषता वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन काम करावे.सौर कृषी वाहिनी प्रकल्प वीज वितरण कंपनीच्या सब स्टेशनसाठी विविध ठिकाणी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहण करण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी.जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात संबंधित विभागाने लक्ष द्यावे,असे ते म्हणाले.

पीएम सूर्यघर योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांना लाभ देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे असे सांगून श्री.पुजार म्हणाले, या योजनेचा ग्रामीण भागातील जास्तीत जास्त कुटुंबांना लाभ देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्यासोबत बैठका घ्याव्यात. तुळजापूर तालुक्यातील दहिफळ येथे ४०० केव्ही सब स्टेशनच्या जागेसाठी वनविभागाशी समन्वय साधून भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी. असे निर्देश श्री.पुजार यांनी यावेळी दिले.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यासाठी जलसंधारण विभागाने नियोजन आतापासूनच करावे असे सांगून श्री.पुजार म्हणाले, शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहित करावे. संबंधित यंत्रणांनी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. यावर्षी गाळ काढण्याचे दिलेले उद्दिष्ट हे मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त गाळ उपसून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचे काम यंत्रणांनी करावे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात या योजनेसाठी संबंधित यंत्रणेच्या तालुकास्तरावर बैठकांचे आयोजन करावे.असे त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेगाने पूर्ण करावी,असे सांगून श्री. पुजार म्हणाले,जिल्हा जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने या अभियानात विशेष लक्ष देऊन कामे पूर्ण करावी.या अभियानात यंत्रणा, ग्रामस्थ तसेच सेवाभावी संस्थांना सहभागी करून घ्यावे असे ते म्हणाले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर उपविभागीय अधिकारी हे ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला उपस्थित होते.

कृषी विभागाच्या योजनांचा घेतला आढावा

जिल्हाधिकारी श्री पुजार यांनी यावेळी कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री पिक विमा योजना,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग,मुख्यमंत्री कृषी अन्न व प्रक्रिया योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,स्मार्ट प्रकल्प,डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना,बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना यासह अन्य कृषीविषयक योजनांचाही आढावा घेतला.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,आत्माचे प्रकल्प संचालक खंडेराव सराफ,प्रभारी कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, सर्व उपविभागी कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

श्री पुजार म्हणाले की, जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांना योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे.कृषीच्या योजना राबविताना क्लस्टर बेस योजना राबाव्यात.शेतकऱ्यांना नगदी पिकाकडे वळविण्यासाठी भाजीपाला व फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करावे.मृदा तपासणी प्रयोगशाळा ह्या बचतगटांच्या गावपातळीवर ग्रामसंघ यांना देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे,त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे श्री.पूजार यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज व गोदामांची व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले, त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे.बचतगटांच्या ग्रामसंघांना अवजारे बँक देण्याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे. पंचायत समितीनिहाय शिबिरे घेऊन त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषीविषयक योजनांचा लाभ देणे सोयीचे होणार आहे,असे ते यावेळी म्हणाले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.माने,प्रकल्प संचालक श्री.सराफ व प्रभारी कृषी विकास अधिकारी श्री. राठोड यांनी राबविण्यात येत असलेल्या विविध कृषीविषयक योजनांची माहिती देऊन योजनांचा किती शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे,कोण कोणते कृषीविषयक प्रकल्प जिल्ह्यात कार्यरत आहे,याची माहिती यावेळी दिली.

  • Related Posts

    कामाचा माणुस – अजित पवार यांचे फोटो व्हिडिओ पाठवा, विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात ‘कामाचा माणूस’ म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा अढळ ठसा उमटवला, असे आदरणीय अजितदादा पवार यांच्या जीवनातील अनमोल क्षण आपण छायाचित्रे आणि चित्रफितींच्या…

    शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे पत्र वितरित बाबत सखोल चौकशी करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

    Spread the love

    Spread the loveमुंबई : शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *