तुळजापूर तालुक्यातील चार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित

Spread the love

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश

तुळजापूर – जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली.या बैठकीत उप कार्यकारी अभियंता,धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.२,उमरगा यांनी तुळजापूर तालुक्यातील (१) येमाई ल.पा. प्रकल्प,(२) मंगरुळ ल.पा. प्रकल्प,(३) आरळी ल.पा.प्रकल्प आणि (४) केमवाडी सा.त.प्रकल्प या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा जोता पातळीच्या खाली गेल्याने आणि या प्रकल्पांवरील पाणीपुरवठा योजनांचा विचार करता,पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणले.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालातही या प्रकल्पांतील पाणीपातळी चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.तसेच,सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचा अवैध उपसा होऊ नये,पाणीपुरवठा योजना सुरळीत चालाव्यात आणि जनावरांसाठीही पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे,यासाठी हे पाणी राखीव ठेवण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या चारही प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढील आदेश येईपर्यंत फक्त पिण्यासाठीच वापरण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.जलसाठा नियंत्रित वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पांवरील पाणीसंवर्धनावर लक्ष ठेवावे,असेही निर्देश देण्यात आले आहेत.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *