महिलांनी विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ राहणे ही काळाची गरज जि.प.अध्यक्षा अर्चना पाटील

Spread the love

सामाजिक समता सप्ताह

धाराशिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी,आज १० एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथील सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर, धाराशिव नगर परिषद नगराध्यक्षा श्रीमती. नेहा काकडे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलकर,जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती.अर्चना नरवाडे,जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे, व्याख्याते महेंद्र चंदनशिवे,प्रा.राजा जगताप,श्रीमती वनिता डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला मेळाव्यात जिल्हाभरातील महिला व बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या की,भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा हक्क दिला असून आर्थिक अडचणींना खचून न जाता शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन स्वयंरोजगार निर्माण करणे आवश्यक आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करून जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचवावे,असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागातील महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे ही आजची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,भारतीय संविधानातून मिळालेल्या लोकशाही,समता व समानतेच्या हक्कांमुळे महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून त्यातून नारीशक्ती अधिक सक्षम होत आहे.शिक्षणामुळे महिलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडत असून त्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.असे त्या म्हणाल्या.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *