उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवमध्ये – कै अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार व पुण्यनगरी बक्षीस व पुरस्कार वितरण.

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी 12 एप्रिल रोजी धाराशिव शहरामध्ये येणार आहेत. शिंदे यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार व दैनिक पुण्यनगरी कुपन स्पर्धेतील बक्षीस व पुण्य पुरस्काराचे वितरण होणार आहे. हा सोहळा नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी सकाळी 11 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा करण्यात येणार आहे.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र इन्स्टट्यिुशन फॉर ट्रान्सफार्मेशनचे (मित्रा) मुख्य  कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, माजी मंत्री आ डॉ तानाजीराव सावंत, आ राणाजगजितसिंह पाटील, आ कैलास घाडगे पाटील, आ प्रविण स्वामी, माजी आ ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती राहणार आहे.

धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये शोधवार्ता गटातून प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), अमोल भास्कर मुळे द्वितीय (बीड), राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर, जि.लातूर) व रोशन मुल्ला तृतीय(उदगीर, जि.बीड) तर विशेष वार्ता गटातून माधव आटकोटे (नांदेड) प्रथम , रमेश अर्जुन कदम (हिंगोली) द्वितीय, दिपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि.धाराशिव) व डॉ. रविंद्र भताने (चापोली, जि.लातूर) तृतीय यांना  कै. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

दैनिक ‘पुण्य नगरी’च्या कूपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहकार क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन हभप वसंतराव नागदे, रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सह्याद्री हॉस्पीटल, अंकुर शिशुगृहाचे डॉ. दिग्गज दापके-देशमुख, बचत गट कार्यातून महिला सक्षमीकरणच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अर्चना माने, कसबे तडवळे (ता.धाराशिव) येथील  आदर्श शिक्षक बाळासाहेब जमाले, व्यसनमुक्ती क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल येरमाळा येथील श्री येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. संदीप तांबारे, तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतशील शेतकरी हणमंत गवळी, पार्डी (ता.वाशी) येथील पोल्ट्री उद्योजक विठ्ठल चौधरी, जकेकुरवाडी (ता.उमरगा) येथील आदर्श सरपंच अमर सूर्यवंशी यांना दैनिक ‘पुण्य नगरी’ समूहाचा पुण्य पुरस्कार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष अब्बास सय्यद (भूम) व श्रीकांत कदम (तुळजापूर) यांसह तालुकाध्यक्ष सुभाष कदम (धाराशिव) अंबादास पोफळे (तुळजापूर) सुरेशकुमार घाडगे (परंडा) प्रमोद कांबळे (भूम) गौतम चेडे (वाशी) बालाजी वडजे (उमरगा) विलास मुळीक (कळंब) इक्बाल मुल्ला (लोहारा) व पदाधिकारी यांनी केले आहे.

  • Related Posts

    व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीचा प्रश्न अखेर मार्गी; परिवहन मंत्र्यांचे तातडीने आदेश मुंबई : अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मिळणारी १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत…

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *