ओबीसी समाजासाठी शासनाच्या १३ महामंडळांचे जिल्हास्तरावर कामकाज सुरू

Spread the love

विविध कर्ज व व्याज परतावा योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन ; पात्र लाभार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा

धाराशिव – इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण सामाजिक व आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत १३ उपमहामंडळांची स्थापना केली असून,या महामंडळांचे जिल्हास्तरावरील कामकाज आता धाराशिव येथे सुरू करण्यात आले आहे.विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे यांनी केले आहे.

शासनाने विविध समाजघटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळांची स्थापना केली आहे. त्यामध्ये जग्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत वाणी),संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज),संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (न्हावी समाज),लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ (लेवा समाज),सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी),स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज),संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज),संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज),सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ (गुजर समाज),संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज),संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री.रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज) आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (आगरी समाज) यांचा समावेश आहे.

या महामंडळांमार्फत लाभार्थ्यांसाठी सहा योजना पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये थेट कर्ज योजना (रु.१ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज),२० टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना,गट कर्ज व्याज परतावा योजना,शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे.या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने अर्जदारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या योजनांबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ,धाराशिव येथे संपर्क साधता येईल.तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२३८६३ वर संपर्क साधावा,असे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे यांनी कळविले आहे.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

    Spread the love

    Spread the loveपाणी व माती संवर्धनासाठी धाराशिवकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *