क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमातून संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना

Spread the love

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धां

धाराशिव – क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना,शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो.दैनंदिन कामकाजातील ताणतणावातून मुक्तता मिळून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.

धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २२ व २३ मार्च रोजी जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून,या स्पर्धेचे उद्घाटन रविवार,२२ मार्च रोजी जिल्हाधिकारी पुजार यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितु खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की,महसूल विभागाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांत सहभागी होता येत आहे.त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढून प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार आहे.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी सर्वश्री.ओंकार देशमुख,रेवैयाह डोंगरे,दत्तू शेवाळे तसेच तहसीलदार मृणाल जाधव,अरविंद बोळगे, गोविंद येरमे,जयवंत पाटील,निलेश काकडे,प्रकाश म्हेत्रे,हेमंत ढोकले आणि रणजितसिंह कोळेकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धांमध्ये 100 मीटर व 200 मीटर धावणे,लांब उडी,उंच उडी, थाळी फेक,भाला फेक,गोळा फेक, 3 किमी चालणे यांसारख्या मैदानी स्पर्धांसह क्रिकेट,व्हॉलीबॉल,थ्रो बॉल,बॅडमिंटन,रिंग टेनिस,खो-खो, कबड्डी,बुद्धिबळ, कॅरम व टेबल टेनिस अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला आहे.


  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *