केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

Spread the love

‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार

धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली उल्लेखनीय कामगिरी,देशाच्या जलदगतीने झालेल्या विकासाची गाथा तसेच जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या नवनवीन योजना आणि त्यांची काटेकोरपणे होणारी अंमलबजावणी याची माहिती नागरिकांना देण्यासाठी केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन ‘केंद्र सरकारची १२ वर्षे सेवा’ तसेच ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५ (VB-G-RAM-G Act 2025)’ या विषयांवर आधारित आहे.प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती,विकासकामे आणि विविध क्षेत्रांतील प्रगती याबाबत नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानकात १ आणि २ सप्टेंबर २०२६ असे दोन दिवस हे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे,तसेच देशाच्या विकासाच्या वाटचालीची माहिती देणे हा या मल्टिमीडिया प्रदर्शनाचा उद्देश आहे. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन विविध योजनांची आणि केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती जाणून घ्यावी,असे आवाहन सोलापूर येथील केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी केले आहे.

  • Related Posts

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    सामंजस्य करार ते प्रत्यक्ष गुंतवणूक,उद्योग आणि रोजगार’ हा विकासाचा मार्ग असावा,पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव उद्योग – गुंतवणुकीसाठी सज्ज ; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा गुंतवणूक परिषदेचे पालकमंत्र्यांनी केले ऑनलाइन उद्घाटन धाराशिव – जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्हा उद्योग,गुंतवणूक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *