असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

Spread the love

चंद्रपूर  : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने सर्व असंघटीत कामगारांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत नोंदणी करण्याचे सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व असंघटित पुरुष किंवा स्त्री कामगार यासाठी नोंदणी करू शकतात.

नोंदणीसाठी पात्रता : वय 18-40 वयोगट, मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी, आयकर भरणारा नसावा, ईपीएफओ व ईएसआयसी अथवा राष्ट्रीय पेंशन योजनेचा सदस्य नसावा.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड, आधारकार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबर, राष्ट्रीयकृत बैंक पासबुक

मिळणारे लाभ : जर कोणत्याही असंघटित कामगाराने या योजनेचे सदस्यत्व घेतले असेल आणि त्याने वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत नियमित योगदान दिले असेल, तर त्याला किमान मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. त्याच्या/तिच्या मृत्यूनंतर, पती/पत्नीला मासिक कुटुंब 50 टक्के पेन्शन मिळेल. लाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरू ठेवता येणार आहे. लाभार्थीस स्वच्छेने योजनेतून बाहेर पडावयाचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत मिळणार आहे.

नोंदणीची कार्यपध्दती : जिल्ह्यातील नागरी सुविधा केंद्र (CSC) मार्फत नोंदणी करण्यात येईल. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांना 55 ते 200 रुपयांपर्यंत प्रतिमाह अंशदान भरावे लागेल. लाभार्थी आधार कार्ड, बैंक पासबुक व मोबाईल क्रमांकासह नागरी सुविधा केंद्रास भेट देईल. लाभार्थीच्या वयानुसार मासिक अंशदानाच्या रक्कमेची गणना सिस्टीमद्वारे ऑनलाईन करण्यात येईल. लाभार्थ्यांनी पहिल्या महिन्याची अंशदानाची रक्कम नागरी सुविधा केंद्रात रोखीने भरावे लागेल. अंशदानाची रक्कम अदा केल्यानंतर पेंशन खाता क्रमांक जारी करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, चंद्रपूर येथे संपर्क करावा. नोंदणीसाठी आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्राला (CSC) भेट द्या. तुमच्या हक्काचे संरक्षण आणि उज्वल भविष्यासाठी आजच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेकरीता नोंदणी करा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्रविण कावळे यांनी केले आहे.

  • Related Posts

    कामगार विभागाची बैठक संपन्न

    Spread the love

    Spread the loveजालना जिल्हा बाल कामगार मुक्त,करण्यासाठी कामाची गती वाढवावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना :- जिल्ह्यातील कामगारांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे. कामगारांच्या जीवनात बदल घडवून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *