धाराशिव जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक :-2026

Spread the love

उमेदवारी अर्ज घेण्यासाठी भाऊगर्दी !

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सुरुवात होताच धाराशिव तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली आहे. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक तहसील परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

सत्ताधारी व विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज घेण्यास सुरुवात केली असून,अनेक गटांतून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.

तहसील कार्यालय परिसरात गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अर्ज घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ही भाऊगर्दी कायम राहण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  • Related Posts

    ८ ऑगस्टपर्यंत गणनापत्र (Enumeration Form) भरण्याचे आवाहन; मतदार यादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाची नागरिकांना सूचना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) 2026 अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले गणनापत्र (Enumeration Form – EF) वेळेत भरावे, असे…

    निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती

    Spread the love

    Spread the loveमतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *