तुळजापूर :- माजी गृहमंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे नातू आणि माजी मंत्री, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव चि. मल्हार पाटील यांचा विवाह सोहळा तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चि. मल्हार यांचा विवाह चि. सौ. कां. डॉ. साक्षी यांच्यासोबत पार पडला.
या सोहळ्यास राज्यातील मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या .
उपस्थित मान्यवरांमध्ये—
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,
उपमुख्यमंत्री अजित पवार,
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ,
परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक
—या सर्वांनी उपस्थिती नोंदवली.
मान्यवरांच्या उपस्थितीमुळे तुळजापूर मध्ये पाटील परिवाराचा विवाह सोहळा संपन्न झाला