धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कचरु नरवडे, पोलीस ठाणे तुळजापूर यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे तुळजापूर येथील गुरनं 93/2025 कलम 103(1),3(5) भा.न्या.सं अन्वये दाखल गुन्ह्यातील प्रकरणात निर्धारित 90 दिवसांच्या कालावधीत चार्जशीट सादर करण्यात निष्काळजीपणा दाखविला. त्यांच्याकडुन जबाबदारीतील कर्तव्यात गंभीर दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले असुन, ही बाब त्यांच्या कर्तव्यातील हलगर्जीपणाचे द्योतक आहे. पोलीस विभागात जबाबदारी आणि शिस्त यांना प्राधान्य दिले जाईल, तसेच अशा निष्काळजीपणास कोणतीही सहनशीलता दाखविण्यात येणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.