Spread the love

धाराशिव – दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी, प्रतिवर्षीप्रमाणेच स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, विमानतळ रोड, आळणी (ता. जि. धाराशिव) येथे रक्षाबंधनाचा सण याहीवेळी अधिक उत्साह, प्रेम आणि आत्मीयतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रेम, बंधुता आणि जिव्हाळ्याचा संदेश देणाऱ्या या सणाने संपूर्ण परिसर आनंदाने उजळून निघाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.डॉ. अभयजी शहापूरकर (अध्यक्ष, सल्लागार समिती, स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह आळणी) हे होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.श्रीमती. भाग्यश्री पाटील मॅडम (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर,धाराशिव), मा. श्रीमती. शफकत आमना मॅडम (जिल्हा पोलीस अधीक्षक,धाराशिव), कळंब-धाराशिव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.कैलास दादा पाटील, मा. श्रीमती. मैना भोसले मॅडम (बालकल्याण समिती सदस्य, धाराशिव), मा. श्रीमती. सुजाता माळी मॅडम (बालकल्याण समिती, धाराशिव), मा. श्रीमती. वैशाली धावणे मॅडम (बालन्याय मंडळ सदस्य, धाराशिव), मा.श्री मयूरजी काकडे (जिल्हाध्यक्ष, प्रहार दिव्यांग संघटना, धाराशिव), मा. श्री मनेशजी पाटील (पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिव), मा.श्री तुषार देशमुख व मित्र परिवार (मित्रत्व फाउंडेशन, तुळजापूर), मा.श्री.प्रदीप खामकर (सचिव, रोटरी क्लब धाराशिव), मा. श्री रणजीत रणदिवे (अध्यक्ष, रोटरी क्लब धाराशिव), मा. श्री अतुलजी कुलकर्णी, मा. श्री तुषारजी वाघमारे, मा. श्री गणेशजी बोधले, मा. श्री विष्णू इंगळे व श्रीमती संजीवनी इंगळे मॅडम, मा. श्री जितेंद्र कुलकर्णी व हेमांगी कुलकर्णी मॅडम, यांच्यासह अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते तसेच तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव मा. श्री शहाजी चव्हाण साहेब, मुख्याध्यापक मा. श्री थोडसरे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व बालगृहातील सर्व मुली उपस्थित होत्या.

मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बालगृहातील मुलींनी सादर केलेले “सुबह सवेरे” हे गीत टाळ्यांचा गजर घडवून आणत सर्वांच्या मनावर कोरले गेले.

यानंतर मा.श्री. चव्हाण सर यांनी प्रास्ताविकेतून संस्थेच्या कार्याचा आढावा देत, धाराशिव जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी मा.श्रीमती.भाग्यश्री पाटील मॅडम यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध शासकीय योजना यांची माहिती दिली तसेच बालगृहातील मुलींना त्या सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मा.श्रीमती.शफकत आमना मॅडम यांनी बालकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अभयजी शहापूरकर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत, “येथील कार्य ही सेवा नसून समाजधर्म आहे,” असे मनोगत व्यक्त केले.

यानंतर मुलींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या सुंदर राख्या मान्यवरांना बांधून प्रेमाचा धागा अधिक घट्ट केला. मित्रत्व फाउंडेशनतर्फे बालगृहातील मुलींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून नवीन गणवेश भेट देण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते मुलींना विविध खाऊ व भेटवस्तूंचे वाटप झाले.
यावेळी एक विशेष आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत संस्थेच्या शाळेतील विशेष शिक्षिका श्रीमती. क्षीरसागर मॅडम व श्रीमती.पोपळे मॅडम यांच्या कन्या कुमारी भक्ती व कुमारी वैष्णवी यांनी वैद्यकीय क्षेत्र तसेच शासकीय सेवेत यश मिळवत कुटुंबाचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गुणवंत मुलींच्या यशाचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे सर्वांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रीमती.रूपाली कांबळे (मानसोपचार तज्ञ) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती. माने मॅडम यांनी केले.
रक्षाबंधनाचा हा सोहळा केवळ राख्या बांधण्यापुरता मर्यादित न राहता, प्रेम, आपुलकी, कृतज्ञता आणि प्रेरणेचा संगम ठरला. मुलींच्या चेहऱ्यावरील निरागस हसू, डोळ्यांतील चमक आणि प्रत्येक मान्यवरांच्या मनातील स्नेहभावना — या सर्वांनी मिळून तो क्षण खऱ्या अर्थाने ‘बंधुत्वा’चा उत्सव बनवला.
संपूर्ण सभागृहात पसरलेली ही भावनांची उब, कार्यक्रम संपल्यानंतरही सर्वांच्या मनात कायमची साठून राहिली.