साबळेवाडी फाटा भूम येथे दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी सुरवसे परिवाराच्या वतीने संत श्रेष्ठ श्री.गजानन महाराज पालखीस अल्पोपहाराचे वाटप

Spread the love

भूम (प्रतिनिधी) – जातो माघारी पंढरीनाथा,तुझे दर्शन झाले आता. या अभंगांच्या भावार्थानुसार पंढरीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत असलेल्या श्री. क्षेत्र शेगाव जिल्हा बुलढाणा येथील संत श्रेष्ठ श्री.गजानन महाराज पालखीचे भूम येथून शेगांव कडे मार्गस्थ होत असताना गजानन महाराज पालखीच्या वारकऱ्यांसाठी चहा व अल्प उपहाराचा ( वडापाव) वाटप कार्यक्रम गजानन महाराजांचे भक्त भूम आगाराचे बसस्थानक प्रमुख मा.श्रीकांत सुरवसे साहेब, नेहरू युवा केंद्र कार्यालयाचे रवि सुरवसे तसेच चि.श्रेयस सुरवसे, रियांश सुरवसे यांचे परिवाराच्या वतीने वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमास भूम आगाराचे अधिकारी/कर्मचारी यांनी वाटप करण्यास मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी मुकेश भगत पाटील, सचिन चौधरी, सतीश कुंभार, हेमंत देशमुख, तेलंग साहेब,भरत कानडे, वैजीनाथ चौरे,राहूल क्षीरसागर, गणेश गिरी, विशाल चांडगे, अशोक बोत्रे महाराज, मनगिरे सर, सस्तुरे साहेब, उपरे साहेब यावेळी उपस्थित होते.

  • Related Posts

    येडशी येथे 13 ऑगस्टपासून श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान यात्रेस प्रारंभ

    Spread the love

    Spread the love‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंग परिसरात महिनाभर भक्तांची मांदियाळी; पर्यटकांसाठी विविध आकर्षणे सज्ज येडशी – धाराशिव तालुक्यातील येडशीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र रामलिंग…

    श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन जनजागृती उपक्रमांचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : पर्यटन जनजागृती संस्था, धाराशिव संचलित पर्यटन विकास समिती,धाराशिव तसेच सकल विरशैव लिंगायत समाज, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *