येडशी येथे 13 ऑगस्टपासून श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान यात्रेस प्रारंभ

Spread the love

‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंग परिसरात महिनाभर भक्तांची मांदियाळी; पर्यटकांसाठी विविध आकर्षणे सज्ज

येडशी – धाराशिव तालुक्यातील येडशीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र रामलिंग देवस्थानच्या वार्षिक यात्रेस दि. १३ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. श्रावण महिन्यानिमित्त भरणारी ही यात्रा तब्बल महिनाभर सुरू राहणार असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात.
हिरवाईने नटलेला डोंगर परिसर, निसर्गरम्य वातावरण आणि धार्मिक महत्त्व यामुळे रामलिंग देवस्थानला ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
रामलिंग परिसरातील ‘सीतेची न्हाणी’, श्रीराम प्रभूंनी बाणाने निर्माण केल्याची श्रद्धा असलेला पाण्याचा धबधबा तसेच हिरव्यागार गवताने नटलेला डोंगर परिसर ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठीही मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.
यात्रेनिमित्त परिसरात विविध प्रकारची दुकाने आणि मनोरंजनाची साधने उभारण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी खेळणी, खाद्यपदार्थ, कंदमुळे, नारळ, पेढे आदींची दुकाने थाटली आहेत. तसेच लहान-मोठे पाळणे आणि विविध मनोरंजनाची साधनेही यात्रेकरूंच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात.
यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येते.
श्रावण महिन्यात महिनाभर भरणाऱ्या या प्रसिद्ध यात्रेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त आणि पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *