श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन जनजागृती उपक्रमांचे आयोजन

Spread the love

धाराशिव : पर्यटन जनजागृती संस्था, धाराशिव संचलित पर्यटन विकास समिती,धाराशिव तसेच सकल विरशैव लिंगायत समाज, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी धाराशिव शहरालगत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या ऐतिहासिक नागनाथ मंदिर परिसरात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच मंदिर परिसराचे ऐतिहासिक महत्त्व जतन करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.दि.१७ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, महिलांसाठी पारंपारिक झोक्याची व्यवस्था,आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे.श्रावणातील पहिला सोमवार असल्याने उपवास करणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात येणार आहे.याशिवाय मंदिर परिसरात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण,पर्यावरण जनजागृती, तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जाणार आहे.या महोत्सवात सर्व पर्यटक,भाविक,महिला, युवक-युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा,असे आवाहन पर्यटन जनजागृती संस्था,धाराशिव संचलित पर्यटन विकास समिती धाराशिव व सकल विरशैव लिंगायत समाज संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *