
धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाची अनियमितता,पावसातील मोठी खंडितता व अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे,पाणीटंचाई,पिकांचे नुकसान, रोजगाराचा अभाव आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे.या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार, रोजंदारी मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पुढील बाबी कराव्यात,धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करावा.,शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, शेतमजूर व कामगारांना रोजगार व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे.पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा यांची तातडीने व्यवस्था करावी.वीज, कर्ज व इतर शासकीय देयकांबाबत दिलासा द्यावा.
दुष्काळाची तीव्रता वाढण्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करावी अशा प्रकारच्या मागण्या जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते तथा नियोजित असंघटित बांधकाम कामगार युनियनचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे यांनी केल्या आहेत.