तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

Spread the love

धाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन एकर जागेत नव्याने “तगर भूमी” बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात येत आहे.धाराशिव जिल्हयातील उपासकांना वर्षावास काळात धम्म देसणा ऐकावयास मिळावी म्हणुन या नव्या ठिकाणी रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी वर्षावास महोत्सव व माजी आमदार ज्ञानराज चौगुले साहेब (राखीव मतदार संघ उमरगा) यांनी बुद्ध विहारासाठी १४ कोटी रु.निधी मिळवून दिल्या बद्दल जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

आहे,प्रमुख धम्मदेसना पुज्य भिक्खु महावीरो थेरो (एम.ए. बौद्ध अध्ययन) पुज्य भिक्खु पय्यानंद थेरो (महाविहार लातूर),पुज्य भिक्खु अश्वजीत (छ. संभाजी नगर),श्रामणेर राहुल,श्रामणेर सोनूत्तर तर प्रमुख धम्मदेशना पुज्य भिक्खू डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाचा धम्मप्रेमींना लाभ मिळणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांसह आसपासच्या जिल्ह्यातील उपासक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सदर कार्यक्रमाचे संयोजक पुज्य भंते सुमेधजी नागसेन व बापुजी सोनटक्के यांनी दिली आहे.जगातील अराजकता व्यवस्थेला बौध्द धम्माच्या विचाराची गरज असुन बौद्ध धम्माच्या विचारा शिवाय पर्याय नाही वर्षावासाच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्धांच्या धम्मविचारांचा प्रसार, सामाजिक समता,बंधुता, करुणा व प्रज्ञेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवातुन करण्यात येणार असुन या वर्षावास महोत्सवात धम्मप्रेमी,उपासक-उपासिका आणि बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेसनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा धम्म सहाय्यक गणेश रानबा वाघमारे यांनी केले आहे.

  • Related Posts

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

    Spread the love

    Spread the loveपाणी व माती संवर्धनासाठी धाराशिवकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *