भारतीय संविधान जनजागृती व फळे वाटप करून वारकरी संप्रदाय दिंडीचे स्वागत

Spread the love

धाराशिव : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती करण्यात आली तर समाज कल्याण विभाग व धाराशिव सेवक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी संप्रदाय दिंडीचे स्वागत करण्यात आले.यावेळी वारकऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच “जिथे जाचाल तिथे वाचाल ” भारतीय संविधान” या संदेशाद्वारे संविधान जनजागृती करण्यात आली.मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला संविधान जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आले होते

समाज कल्याण विभागाच्या वतीनेही वारकरी दिंडीत संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली.भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासत वारकरी संप्रदाय दिंडी यातुन मानवतेचा संदेश देण्यात येतो असे मनोगत व्यक्त करत भारतीय संविधान हे जगातील एकमेव सर्व श्रेष्ठ संविधान असुन आपणाला न्याय व जगायला शिकविते असे मनोगत सहा आयुक्त सचिन कवले यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाची रुपरेषा गणेश वाघमारे यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकारी मॅडम, दिव्यांग महामंडळाचे अधिकारी सच्चिदानंद बांगर,मतदार जनजागरण समितीचे गणेश रानबा वाघमारे,धाराशिव सेवक फाऊंडेशनचे विवेक यादव, विजय राठोड,दिनेश देवकते, प्रकाश चव्हाण,अतुल जगताप, श्री. गुरव,संकेत जगताप तसेच शहर वाहतूक (ट्रॅफिक) पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *