Spread the love

धाराशिव : जिल्हा तसेच शहर परिसरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. तीस दिवसांच्या पवित्र उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी आज सकाळी मोठ्या संख्येने इदगा मैदानावर एकत्र येत नमाज अदा केली.

सकाळी नऊ वाजता नमाज पठण करून उपस्थितांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध राजकीय व सामाजिक नेत्यांची उपस्थिती लाभली होती. सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे, या उत्सवात सर्व धर्मीय नागरिकांनी सहभागी होत सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. शासकीय अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमजान ईदच्या निमित्ताने जिल्ह्यात बंधुता, ऐक्य आणि शांततेचा संदेश अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.