वाशी आयटीआय मध्ये ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ व ‘हर घर तिरंगा’ उत्साहात साजरा

Spread the love

धाराशिव – जैन मुनि कुलभूषण देशभूषण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशी येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजवंदन सोहळा व ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून व कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली.

‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ या विषयावर प्रमुख व्याख्याते श्री.जी. वाय.देशमुख यांनी १४ ऑगस्ट १९४७ च्या फाळणीतील वेदना, त्याग,मानवी हक्कांचे उल्लंघन व ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर सखोल भाष्य केले.त्यांनी सांगितले की,सन २०२१ पासून हा दिवस देशभरात स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.हा दिवस त्यागाचे स्मरण,मृत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना,शांततेचा संदेश आणि भविष्यासाठी शिकवण देतो. आपण आज स्वतंत्र भारतात असूनही जातीयता,द्वेष आणि असहिष्णुता टाळून ऐक्य,बंधुता आणि मानवी मूल्ये जपली पाहिजेत, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गटनिदेशक श्री. डी.आर.वाघमारे होते.प्रमुख पाहुणे संस्था नियोजन समिती सदस्य श्री. संजय कवडे,नागरिक प्रतिनिधी श्री. बाबासाहेब कवडे व माजी सैनिक श्री.ए.व्ही.बळवंत उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती टी.एच.शेख यांनी केले.आभार विशाल कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य श्री.एस.एस. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.
           

  • Related Posts

    90 लाखांचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान – पालकमंत्री सरनाईकांचा दौरा

    Spread the love

    Spread the loveतुळजाभवानी नवरात्र, प्रशासकीय व हॉस्पिटल आढावा – खासदार ओमराजेंच्या घरी भेट धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शनिवारी 15 ऑगस्ट…

    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहणभारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार,दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *