90 लाखांचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान – पालकमंत्री सरनाईकांचा दौरा

Spread the love

तुळजाभवानी नवरात्र, प्रशासकीय व हॉस्पिटल आढावा – खासदार ओमराजेंच्या घरी भेट

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज.

राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शनिवारी 15 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, 45 मीटर उंचीचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान 2.0 गिनीज बुक नोंद, तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सव, प्रशासकीय विभागाची आढावा बैठक व तुळजापूर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सद्यस्तिथी आढावा बैठक घेऊन ते खासदार ओमराजेंच्या घरी गोवर्धनवाडी येथे सदिच्छा भेट देणार आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांचा हा पहिलाच दौरा असुन अनेक राजकीय, प्रशासकीय घडामोडी घडणार आहेत.

धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नावीन्यपुर्ण योजने अंतर्गत 90 लाख रुपयांच्या निधीतून भव्य असा स्वराज्य ध्वज उभा करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या मार्फत पवन सर्व्हिसेस या एजेन्सीने हे काम केले असुन याचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे, या ध्वजामुळे धाराशिव शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

पालकमंत्री सरनाईक सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी 8.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 9.05 वाजता भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभा’स ते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 9.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात धाराशिव जिल्ह्यातील प्रशासकीय विभागांचा आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी शारदीय नवरात्र महोत्सव 2026 संदर्भातील तयारी तसेच श्री क्षेत्र तुळजापूर येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. सकाळी 11 वाजता 45 मीटर उंच स्वराज्य ध्वजाच्या उद्घाटन सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत.

शिंगोली वनक्षेत्रात आयोजित ‘हरित धाराशिव अभियान 2.0’ या कार्यक्रमास 11. 45 वाजता पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 वाजता खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता गोवर्धनवाडी येथून मोटारीने छत्रपती संभाजी महाराज विमानतळाकडे रवाना होतील.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *