धाराशिव – दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी विश्ववंदनीय विश्वभूषण शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले होते. भारताला, महाराष्ट्राला, स्वराज्याला, रयतेला पोरके करून महाराज कैलासावर स्वारी करायला निघून गेले.अवघा भारत दुःखाच्या अंधकारात बुडाला होता. जगाला हेवा वाटावा असा इतिहास निर्माण करुन छत्रपती शिवाजी महाराज आनंतात विलीन झाले होते. याच्या स्मरणार्थ शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या महानिर्वाण दिनी मौनवृत्त व आदरांजलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्या समोर गुरुवार दि. 3 एप्रिल 2025 रोजी समितीचे मावळे दुपारी 12 ते 12:30 यादरम्यान मौनवृत्त पाळून महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. सर्वांनी महाराजांचे स्मरण करून पुष्पहार अर्पण करून प्रत्येकाने शिवरायांच्या चरणी पुष्प कमल अर्पण केले. आजचा हा दिवस अत्यंत दुःखाचा व वियोगाचा असल्या कारणाने प्रत्येकाने मौनव्रत धारण केले होते. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे अध्यक्ष गौरव बागल, शहराध्यक्ष हनुमंत यादव, तालुकाध्यक्ष मनोज मोरे, रिक्षा समिती अध्यक्ष वेंकटेश पडिले, शहर उपाध्यक्ष आकाश भोसले, शहर सचिव भैरवनाथ रणखांब, शहर कार्याध्यक्ष बालाजी खोचरे, तालुका सचिव बालाजी पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक अॕड. संजय शिंदे, हनुमंत तांबे सर, अच्युत थोरात मेजर, विकास जाधव, दत्तात्रय साळुंके, बबलू भोईटे, ऋषिकेश काळे, सतीश थोरात, ज्योतीराम काळे, रोहित पवार, अमोल साळुंके, अविनाश रणखांब, व्यंकटेश पडिले, अमोल गोरे, भैरवनाथ रणखांब, आशिष क्षीरसागर, रोहन माने,नरसिंग पडिले, गणेश मडके, वैभव घोगरे, इत्यादी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच धाराशिवकर शिवप्रेमी शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

