दोन बालकांना नात्यांतर्गत दत्तक विधान ; दोन कुटुंबांच्या नात्याला कायदेशीर अधिष्ठान

Spread the love

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दत्तक आदेश सुपूर्द

धाराशिव – नात्यांची वीण आधीच घट्ट होती.आपुलकी आणि प्रेमही होते.आता या नात्याला कायद्याचेही भक्कम अधिष्ठान मिळाले.जिल्ह्यात दोन बालकांची नात्यांतर्गत दत्तक विधान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित दोन कुटुंबांना अधिकृत दत्तक आदेश सुपूर्द करण्यात आले.

पूर्वीच्या तुलनेत दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान,सुटसुटीत आणि पारदर्शक झाल्यामुळे संबंधित पालकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेशीर प्रक्रियेचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर दोन बालकांच्या नात्यांतर्गत दत्तक विधानाचे अधिकृत आदेश पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.त्यामुळे या बालकांना आपल्याच कौटुंबिक वातावरणात हक्काचे,सुरक्षित आणि प्रेमाचे स्थान मिळण्याबरोबरच त्या नात्याला आता कायदेशीर मान्यताही प्राप्त झाली आहे.

प्रभारी जिल्हा बालविकास अधिकारी किशोर गोरे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी श्रीमती.विभावरी खुने व विधी व परिविक्षा अधिकारी श्रीमती.जयश्री भाले यांच्या माध्यमातून केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या नव्या सुधारित नियमांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण करण्यात आली.

पूर्वी दत्तक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागत असल्याने संबंधित कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.मात्र,नवीन नियमांनुसार जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारांमुळे दत्तक प्रक्रियेला गती मिळाली आहे.परिणामी पालकांचा वेळ वाचण्याबरोबरच दीर्घकाळ चालणाऱ्या प्रक्रियेमुळे त्यांच्यावर येणारा मानसिक ताणही कमी झाला आहे.प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक झाल्याचा अनुभव संबंधित कुटुंबांनी या वेळी व्यक्त केला.

नात्यांमधील आपुलकीला कायद्याची साथ मिळाली. नात्यांतर्गत दत्तक विधान’ प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे बालकाला स्वतःच्या नातेसंबंधातील कुटुंबामध्येच सुरक्षित वातावरण मिळते.कुटुंबातील आपुलकी,जिव्हाळा आणि भावनिक नाते कायम ठेवतानाच बालकाला कायदेशीर हक्क आणि सुरक्षिततेचे अधिष्ठान मिळते.धाराशिवमध्ये पूर्ण झालेल्या या दोन प्रक्रियांमुळे दोन बालकांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या नात्याला अधिकृत कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

दत्तक आदेश मिळाल्यानंतर संबंधित कुटुंबांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. प्रभारी जिल्हा बालविकास अधिकारी श्री.गोरे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि महिला व बालविकास विभागाच्या संपूर्ण चमूने अत्यंत वेगाने आणि सहकार्याच्या भूमिकेतून प्रक्रिया पूर्ण केली. आतापर्यंत एकूण सात प्रकरणांमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे,अशा शब्दांत दत्तक घेणाऱ्या कुटुंबांनी आपला आनंद आणि समाधान व्यक्त केले.

या आनंदाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दोन्ही बालकांना उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.बालकांच्या संगोपनासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत आवश्यक ते पूर्ण सहकार्य करण्यात येईल,असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.

प्रशासनाच्या गतिमान,पारदर्शक आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे दोन कुटुंबांच्या आनंदाला कायदेशीर मान्यतेची जोड मिळाली आहे.त्याचबरोबर जिल्ह्यात कायदेशीर दत्तक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचून या प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.

  • Related Posts

    निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी विहित वेळेत पार पाडाजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveऔरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा बैठक धाराशिव – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि…

    भटके-विमुक्त कागदपत्रे अभियानाला परंड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ; तीन दिवसांत ४७१ सेवा व कागदपत्रांची कार्यवाही

    Spread the love

    Spread the loveविविध प्रमाणपत्रे,शासकीय योजना व सेवांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन धाराशिव – शासकीय योजनांचा लाभ घेण्याची इच्छा आहे,मात्र त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांची पूर्तता कशी करायची,अर्ज कुठे करायचा, कोणत्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *