ऊस वाड्याचा एकही भाग वाया जाऊ देऊ नका ; जनावरांच्या चाऱ्यासाठी नियोजन कराजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Spread the love

साखर कारखाने,कृषी,पशुसंवर्धन विभाग व मुरघास व्यावसायिकांची संयुक्त बैठक

धाराशिव – पावसाच्या दीर्घ खंडामुळे शिवारातील पिकांबरोबरच आता पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर येत आहे. येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासू नये,यासाठी जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक चारा स्रोताचा काटेकोर आणि परिणामकारक वापर करण्याची गरज आहे.आगामी गळीत हंगामात ऊस तोडणीनंतर उपलब्ध होणारा ऊस वाडा वाया जाऊ न देता त्याचे नियोजनबद्ध संकलन करून जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त वापर करावा. तसेच मुरघास निर्मितीला चालना देऊन तो स्थानिक पशुपालकांना उपलब्ध होईल, यासाठी आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी,कृषी विभाग,पशुसंवर्धन विभाग तसेच मुरघास निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत आगामी काळातील संभाव्य चारा गरज, उपलब्ध चारा स्रोत,ऊस वाड्याचे संकलन व वापर आणि मुरघास निर्मिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘आजचे नियोजन उद्याची चारा टंचाई कमी करेल’
यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम पिकांबरोबरच पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या उपलब्धतेवरही होण्याची शक्यता आहे.त्यामुळे चारा टंचाई तीव्र झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा आतापासूनच योग्य वापर करणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील पशुधन आणि विशेषतः दुभत्या जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहील, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,असे श्री.पुजार यांनी सांगितले.

आगामी गळीत हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी होणार आहे.ऊस तोडल्यानंतर शेतात उपलब्ध होणारा ऊस वाडा हा पशुधनासाठी महत्त्वाचा चारा स्रोत ठरू शकतो.त्यामुळे हा ऊस वाडा शेतात वाया जाऊ न देता त्याचे संकलन, साठवणूक आणि पशुपालकांपर्यंत उपलब्धता यासाठी साखर कारखान्यांनी नियोजन करावे,अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर कोणत्या भागात किती ऊस वाडा उपलब्ध होऊ शकतो,त्याचे संकलन कशा पद्धतीने करता येईल आणि गरज असलेल्या भागातील पशुपालकांपर्यंत तो कसा पोहोचविता येईल,याचा समन्वयाने विचार करण्याची आवश्यकता बैठकीत व्यक्त करण्यात आली.

मुरघास निर्मितीवरही भर
हिरवा चारा उपलब्ध असतानाच त्याचे मुरघासामध्ये रूपांतर करून योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास टंचाईच्या काळात त्याचा पशुधनासाठी उपयोग करता येतो.त्यामुळे जिल्ह्यात मुरघास निर्मितीला चालना देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.मुरघास तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी उपलब्ध हिरव्या चाऱ्याचा अधिकाधिक उपयोग करून मुरघास निर्मिती करावी आणि तो स्थानिक शेतकरी व पशुपालकांना उपलब्ध होईल,यासाठी आवश्यक नियोजन करावे,असे सांगण्यात आले.

साखर कारखाने,कृषी व पशुसंवर्धन विभाग तसेच मुरघास उत्पादक यांनी स्वतंत्रपणे काम न करता परस्पर समन्वयातून चाऱ्याची उपलब्धता,संकलन, साठवणूक आणि गरजेनुसार वितरण याबाबत नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

दुष्काळाचा फटका केवळ शेतातील उभ्या पिकापुरता मर्यादित राहत नाही.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन करणाऱ्या कुटुंबांसाठी जनावरे ही रोजच्या उत्पन्नाची आधाररेषा असतात. त्यामुळे पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता टिकवून पशुधनाचे संवर्धन करणे हे दुष्काळी परिस्थितीतील महत्त्वाचे आव्हान आहे.उपलब्ध चाऱ्याचा अपव्यय टाळून त्याचा प्रत्येक भाग पशुधनासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आतापासूनच नियोजनावर भर दिला आहे.

जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता ही प्रशासनाची प्राथमिकता असून,संभाव्य टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध प्रत्येक चारा स्रोताचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे.साखर कारखान्यांनी ऊस वाड्याच्या संकलनासाठी पुढाकार घ्यावा,कृषी व पशुसंवर्धन विभागाने आवश्यक समन्वय साधावा आणि मुरघास उत्पादकांनी स्थानिक गरजेला प्राधान्य देऊन नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बैठकीत दिले.

  • Related Posts

    धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी

    Spread the love

    Spread the loveदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाराशिव – पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे शिवारातील पिकांबरोबरच आता पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.येणाऱ्या काळात जनावरांच्या गोठ्यात चारा कमी पडू नये आणि…

    नागरिकांना सेवा देतानाच त्यांच्याकडून सूचनाही मागवाजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveसुधारणा उत्सवाबाबत बैठक धाराशिव – शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना केवळ सेवा देणे एवढ्यापुरती प्रशासनाची भूमिका मर्यादित न राहता,ती सेवा आणखी सहज,कमी प्रक्रियेत आणि कमीत कमी वेळेत प्रभावीपणे कशी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *